कोरोनासारख्या अभूतपूर्व संकटात राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी निःस्वार्थ भावनेने जनतेची सेवा केली. रुग्णालयातील खाटा, ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर, व्हेंटिलेटर, रेशन किट, जेवण आणि मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देत त्यांनी अनेक कुटुंबांना आधार दिला आणि कठीण काळात माणुसकीचा आदर्श घडवला.
प्रभाग क्रमांक २५ मध्ये राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या पुढाकाराने रेमडीसीवीर या जीवनावश्यक औषधाच्या वाढीव दरांविरोधात
भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. कोरोनासारख्या गंभीर आजारात रेमडीसीवीर औषध अत्यंत महत्त्वाचे असताना त्याचे अवाजवी दर सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या आंदोलनात नागरिक, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. औषध कंपन्यांनी दर कमी करावेत व शासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली.


