प्रिय बंधू - भगिनींनो,
सप्रेम नमस्कार,
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक संपन्न होत आहे. लोकशाहीच्या या उत्सवामध्ये आपण सर्वजण मतदानाचा हक्क बजावून आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी महानगरपालिकेमध्ये पाठवून सर्वांगीण विकासाचा पाया रचण्याचे महान कार्य करणार आहात. भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी या निवडणुकीत उभा आहे.
माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितभाई शहा, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष नितीनजी नबीन यांच्या दूरदृष्टीने आणि समर्थ नेतृत्वाने देशाचा होत• असलेला जागतिक पातळीवरील विकास, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण, महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या सक्षम नेतृत्वाने महाराष्ट्र राज्याचा होत असलेला सर्वांगीण विकास आपण सर्वजण जाणताच.
हाच विकास आराखडा डोळ्यांसमोर ठेवून पुणे शहराचे लोकप्रिय खासदार, केंद्रीय मंत्री मा. मुरलीधरआण्णा मोहोळ, महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. आ. चंद्रकांतदादा पाटील, आमदार माधुरीताई मिसाळ, आमदार हेमंतभाऊ रासने आणि शहर अध्यक्ष धिरजजी घाटे यांनी पुणे शहराचे प्रतिनिधित्व करत पुणे शहराला जलद गतीने प्रगतीपथावर नेले आहे.
या सर्व आदर्श नेतृत्वांचे कार्य डोळ्यांसमोर ठेवूनच मी प्रभाग क्र. २५ च्या विकासाचा आराखडा तयार केला आहे. 'सेवा है यज्ञ कुंड समिधा सम हम जले' हा ध्यास उराशी बाळगून मी मागील दोन दशकांमध्ये सातत्याने काम करत राहिलो, विविध कामांच्या माध्यमातून आपण सर्वजण सातत्याने भेटलो आहोतच. सर्वप्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि नंतर स्वतः या भारतीय जनता पक्षाच्या संस्कारात मी वाढलो आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचे संस्कार माझ्यावर घडत राहिले. युवकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करताना, जनतेच्या हक्कांसाठी लढताना माझ्यातील नेतृत्वगुण विकसित होत गेले आणि 'सामाजिक कार्यकर्ता' ही नवी ओळख मला मिळाली.
एक सच्चा कार्यकर्ता म्हणून सेवेसी सदैव तत्पर' राहण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला आणि इथून पुढेही करत राहणार. माझ्यातील कार्यकर्ता हा सार्वजनिक गणेशोत्सवातून घडलेला आहे. निंबाळकर तालीम सार्वजनिक गणेशोत्सवातून विविध सामाजिक उपक्रम राबवले. या निमित्ताने समाजाच्या सर्व स्तरातील लोकांशी संपर्क आला. जनसामान्यांचे प्रश्न समजून घेता आले, ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करता आले. या प्रयत्नांनीच विविध पदांची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाली. आदरणीय स्वर्गीय खा. गिरीशभाऊ बापट यांच्या मार्गदर्शनाखाली मी राजकीय क्षेत्रात कार्याची मुहूर्तमेढ रोवली. यामध्ये प्रामुख्याने २०१२ पासून बँक कर्मचारी यांच्यासाठी बँक कर्मचारी संघाच्या माध्यमातून काम करत आहे. स्व. आमदार मुक्ताताई टिळक यांचेही अमूल्य मार्गदर्शन मला वेळोवेळी मिळाले. २०१७ पासून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. २०२० साली भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या पुणे शहराध्यक्ष पदी निवड झाली. २०२३ आणि २०२५ साली भारतीय जनता पक्ष पुणे शहर सरचिटणीस पदी निवड झाली. या सर्व पदांवर काम करताना जनसेवा हा एकमेव ध्यास आहे. शहराध्यक्ष माननीय धीरजजी घाटे आणि माननीय गणेशजी बीडकर यांचे अमूल्य मार्गदर्शन मला वेळोवेळी लाभले आहे.
'राष्ट्र प्रथम' हा मूलमंत्र घेऊन मी काम करताना प्रत्येक प्रश्नासाठी लढलो. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला तेव्हा त्याविरोधात तीव्र आंदोलन केले, कोरोना काळात रेमडीसीवीर प्रश्नासाठी आंदोलन केले. अशा अनेक आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढलो. त्याचसोबत जनसामान्यांना आवश्यक असणारे अनेक लोकोपयोगी उपक्रम मी राबवले. अनेक शासकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले, कोरोना सारख्या महामारीच्या कठीण काळात गरजू लोकांसाठी सातत्याने खंबीरपणे सेवाकार्यासाठी उभा राहिलो. अनाथ मुलांसाठी सातत्याने काम केले. प्रभागातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभलेले अनेक धार्मिक आणि सामाजिक उपक्रम आयोजित केले.
पुणे महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जाताना प्रभाग क्रमांक २५ चा विकास आराखडा डोळ्यांसमोर ठेवूनच मी सुरुवात केलेली आहे. प्रभाग क्र. २५ मधील प्रत्येक प्रश्नासाठी सातत्याने काम करत असतानाच भविष्यातील अनेक प्रश्नांवर आजच योग्य उत्तर शोधून त्यानुसार विकासाचा पाया मजबूत करण्याचा मी निर्धार केला आहे. प्रभाग क्र. २५ ही पुणे शहराची खरी ओळख आहे. त्यामुळे आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास साधून विकासाचे रोल मॉडेल उभे करण्याचा माझा प्रयत्न आहे. आपला प्रभाग क्रमांक २५ हा महान ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला प्रभाग आहे.
हा वारसा जतन करतानाच उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत करणे ही मी माझी जबाबदारी समजतो. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची अंत्योदय ही संकल्पना सत्यात उरवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्र. २५ मध्ये भरीव कार्य केलेले आहेच. आता त्यापुढील टप्प्यात प्रभाग क्र. २५ हा एक आदर्श प्रभाग म्हणून घडवण्यासाठी मी सैव प्रयत्नशील आहे. गरज आहे ती आपल्या विश्वासाची आणि खंबीर साथीची.
आपला विश्वासू,
राघवेंद्र बाप्पु मानकर

राजकीय जबाबदाऱ्या :
‘शासन आपल्या दारी’ – शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत
अहोरात्र जनसेवेला समर्पित; २४ तास जनसेवा कार्यालय
रेमडीसीवीरच्या वाढीव दरांविरोधात लढा
ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबीर
आपला प्रभाग, स्वच्छ सुंदर प्रभाग – ‘मिशन स्वच्छ प्रभाग–२५’
शालेय विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करण्यात आले
लाडक्या लेकींसाठी ‘सुकन्या समृद्धी’



