कोविड काळात आलेल्या आर्थिक संकटामुळे केवळ फी न भरू शकल्यामुळे किंवा उशिरा भरल्याने कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या शिक्षण संस्थांविरोधात राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन केले. शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढून याबाबतचे निवेदन देत फी माफी व सवलतीची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कांविषयी वेळोवेळी लढा देण्यात आला.
शालेय विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करण्यात आले


