‘मिशन स्वच्छ प्रभाग–२५’ या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता यंत्रणा उभारणी, नागरिक जनजागृती, ५,००० डस्टबिनचे वाटप आणि स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शनिवार पेठ व परिसरात स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास चालना मिळत आहे.
आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा या अभियानाअंतर्गत आपल्या प्रभागात राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या माध्यमातून ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ हे अभियान राबविण्यात येत आहे. दररोज विविध परिसराची स्वच्छता, कचरा संकलनासाठी मोफत डस्ट बिनचे वाटप, कचरा उचलण्यासाठी घंटागाडी आणि स्वच्छतेविषयक तक्रारी व मदतीसाठी हेल्पलाईनची सोय या अभियानाअंतर्गत करण्यात आली आहे. अल्पावधीतच या अभियानाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.


